वाढदिवस साजरा करताना हातात दिला विषारी साप,साप चावल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

वाढदिवस साजरा करताना हातात दिला विषारी साप,साप चावल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे.एका तरुणाचा वाढदिवस साजरा करताना त्याच्या मित्राने बर्थडे बॉयच्या हातात चक्क साप दिला आणि त्याला फोटो काढायला सांगितले. मात्र सर्पदंशाने बर्थडे बॉयचा दुर्देवी मृत्यू झाला.

बुलढाणाच्या चिखली शहरात गजानन नगर येथे राहणाऱ्या संतोष जगदाळे नावाच्या  तरुणाचा 5 जुलै रोजी वाढदिवस होता. तरुणाच्या मित्राने पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरा केला आणि सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सर्पमित्र अरिफ खान आणि धीरज ने मित्राचा वाढदिवस नेहमीसाठी लक्षात राहावा म्हणून संतोषच्या हातात चक्क साप दिला आणि त्याला फोटो काढायला सांगितले.संतोष ने मित्रावर विश्वास ठेवत सापाला हातात घेतले आणि त्याला हातात धरून फोटो काढले. मात्र सापाने त्याचा बोटाला दंश केले.    

सापाने दंश केल्यावर संतोष आणि त्याचे मित्र घाबरले. त्यांच्या मित्रांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेले मात्र त्याला योग्य उपचार मिळाला नाही आणि त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयत संतोषच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तक्रारीवरून संतोषच्या दोघां मित्रावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

 

Edited by – Priya Dixit  

Go to Source