गळफास लावून व्हिडिओ बनवून केली तरुणाने आत्महत्या, म्हणाला मित्रांनो लग्न करू नका!

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाने गळफास घेऊन व्हिडीओ बनवत आत्महत्या केली आहे.तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये त्यांने मित्रांना लग्न करू नका असे सांगितले आहे

गळफास लावून व्हिडिओ बनवून केली तरुणाने आत्महत्या, म्हणाला मित्रांनो लग्न करू नका!

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाने गळफास घेऊन व्हिडीओ बनवत आत्महत्या केली आहे.तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये त्यांने मित्रांना लग्न करू नका असे सांगितले आहे. 

गाझियाबाद्च्या लोणीतील अंकुर विहार पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने स्वतःचा एक व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरून मित्रांना पाठवले.या व्हिडीओ मध्ये तरुणाने स्वतःच्या गळ्यात गळफास घेतली आहे मी आत्महत्या करत आहे आणि यासाठी माझी पत्नी आणि सासरचे लोकं जबाबदार आहे. मी हा व्हिडीओ जाणीवपूर्वक बनवत आहे. माझ्या आत्महत्येला माझ्या सासरचे मंडळी माझी पत्नी, पत्नीची बहीण, सासरचे नातेवाईक जबाबदार आहे. माझे सासरचे आणि माझी पत्नी माझ्यावर अत्याचार करते. आता मला हा त्रास सहन होत नाही. माझा मानसिक छळ होत आहे. त्याला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. 

मित्रांनो वाईट चारित्र्याच्या मुलीशी लग्न करू नका. माझ्या पश्चात माझी संपत्ती माझ्या मुलांना दयावी. आणि माझ्या पार्थिवावर सरकार आणि प्रशासनाने अंत्यसंस्कार करावं असे त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे. 

पोलिसांना घटनेची माहिती मिळतातच ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलीस पुढील तपास करत आहे. 

Edited by – Priya Dixit  

Go to Source