वाडिया रुग्णालयात मुलीच्या पोटातून काढला केसांचा गुंता

गेल्या काही दिवसांपासून पोटदुखी, अस्वस्थता आणि उलट्यांचा त्रास होत असलेल्या 10 वर्षीय मुलीच्या पोटातून 50 सेमी लांबीचा केसांचा गोळा (hair ball) काढण्यात आला. परेलच्या (parel) वाडिया रुग्णालयातील (wadia hospital) डॉक्टरांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. या मुलीवर गॅस्ट्रोस्टॉमी करण्यात आली. मुलीला रॅपन्झेल सिंड्रोम (repunzel syndrome) नावाचा दुर्मिळ विकार असल्याचे आढळून आले. हा विकार 10 पैकी 8 प्रकरणांमध्ये लहान मुले, किशोरवयीन मुली आणि 30 वर्षांखालील तरुणींमध्ये आढळतो. वसईत राहणाऱ्या एका 10 वर्षीय मुलीला 15-20 दिवसांपासून पोटदुखी, अस्वस्थता, उलट्यांचा त्रास होत होता. तिचे पालक तिला उपचारासाठी काही स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले. पण निदान होऊ शकले नाही. मुलीच्या पालकांनी तिला वाडिया रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, मुलीला 4-5 दिवसांपासून बद्धकोष्ठता, कुपोषण, वजन कमी होणे, पोटदुखी अशी लक्षणे आढळून आली. वैद्यकीय तपासणीत मुलीच्या पोटात केसांचा गुंता आहे हे उघड झाले. तिला ट्रायकोफॅगिया (केस खाणे), ट्रायकोटिलोमॅनिया (केस खेचणे)चे निदान झाले. केस खाल्ल्यामुळे मुलीला रॅपन्झेल सिंड्रोम झाला होता. ही एक दुर्मिळ स्थिती आहे. ज्यामध्ये केसांचा मोठा गुंता पोटात अडकतो आणि लहान आतड्यात पसरतो. रॅपन्झेल सिंड्रोम प्रामुख्याने मानसिक विकार असलेल्या तरुण स्त्रियांमध्ये होतो.  शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मुलीला दुर्मिळ रॅपन्झेल सिंड्रोम असल्याने आम्ही खूप घाबरलो. मात्र वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने आमच्या मुलीला नवजीवन मिळाले, असे मुलीच्या आईने सांगितले.हेही वाचा Badlapur News : बदलापुरातील तब्बल 300 आंदोलकांवर गुन्हे 2 लाख अंगणवाडी सेविका वेतनवाढीपासून अद्याप वंचित

वाडिया रुग्णालयात मुलीच्या पोटातून काढला केसांचा गुंता

गेल्या काही दिवसांपासून पोटदुखी, अस्वस्थता आणि उलट्यांचा त्रास होत असलेल्या 10 वर्षीय मुलीच्या पोटातून 50 सेमी लांबीचा केसांचा गोळा (hair ball) काढण्यात आला. परेलच्या (parel) वाडिया रुग्णालयातील (wadia hospital) डॉक्टरांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. या मुलीवर गॅस्ट्रोस्टॉमी करण्यात आली. मुलीला रॅपन्झेल सिंड्रोम (repunzel syndrome) नावाचा दुर्मिळ विकार असल्याचे आढळून आले. हा विकार 10 पैकी 8 प्रकरणांमध्ये लहान मुले, किशोरवयीन मुली आणि 30 वर्षांखालील तरुणींमध्ये आढळतो.वसईत राहणाऱ्या एका 10 वर्षीय मुलीला 15-20 दिवसांपासून पोटदुखी, अस्वस्थता, उलट्यांचा त्रास होत होता. तिचे पालक तिला उपचारासाठी काही स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले. पण निदान होऊ शकले नाही. मुलीच्या पालकांनी तिला वाडिया रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, मुलीला 4-5 दिवसांपासून बद्धकोष्ठता, कुपोषण, वजन कमी होणे, पोटदुखी अशी लक्षणे आढळून आली. वैद्यकीय तपासणीत मुलीच्या पोटात केसांचा गुंता आहे हे उघड झाले. तिला ट्रायकोफॅगिया (केस खाणे), ट्रायकोटिलोमॅनिया (केस खेचणे)चे निदान झाले.केस खाल्ल्यामुळे मुलीला रॅपन्झेल सिंड्रोम झाला होता. ही एक दुर्मिळ स्थिती आहे. ज्यामध्ये केसांचा मोठा गुंता पोटात अडकतो आणि लहान आतड्यात पसरतो. रॅपन्झेल सिंड्रोम प्रामुख्याने मानसिक विकार असलेल्या तरुण स्त्रियांमध्ये होतो. शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मुलीला दुर्मिळ रॅपन्झेल सिंड्रोम असल्याने आम्ही खूप घाबरलो. मात्र वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने आमच्या मुलीला नवजीवन मिळाले, असे मुलीच्या आईने सांगितले.हेही वाचाBadlapur News : बदलापुरातील तब्बल 300 आंदोलकांवर गुन्हे2 लाख अंगणवाडी सेविका वेतनवाढीपासून अद्याप वंचित

Go to Source