कल्याण : शिक्षकांच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

कल्याण (kalyan) पूर्वेतील आयडियल स्कूलच्या 12 वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. शाळेतील शिक्षकाच्या सततच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विघ्नेश पात्रो (१२) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आयडियल स्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होता. विघ्नेशने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत त्याने शाळेतील शिक्षकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या (deceased) केल्याचे पोलिसांनी सांगितले. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणजवळील वरप येथील सेक्रेड हार्ट शाळेतील अनिश दळवी या विद्यार्थ्याने शाळा प्रशासनाच्या मनमानीला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी शाळेचे संचालक अल्विन अँथनी याला टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षकांच्या छळाला कंटाळून अलीकडे विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही शाळांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.हेही वाचा मुंबई मेट्रो 7A मुळे विमानतळ थेट गाठता येईल लोकल ट्रेनमध्ये मोटरमनच्या कॅबमध्ये तरुण अचानक शिरला आणि…

कल्याण : शिक्षकांच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

कल्याण (kalyan) पूर्वेतील आयडियल स्कूलच्या 12 वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. शाळेतील शिक्षकाच्या सततच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.विघ्नेश पात्रो (१२) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आयडियल स्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होता. विघ्नेशने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत त्याने शाळेतील शिक्षकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या (deceased) केल्याचे पोलिसांनी सांगितले.कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणजवळील वरप येथील सेक्रेड हार्ट शाळेतील अनिश दळवी या विद्यार्थ्याने शाळा प्रशासनाच्या मनमानीला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी शाळेचे संचालक अल्विन अँथनी याला टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षकांच्या छळाला कंटाळून अलीकडे विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही शाळांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.हेही वाचामुंबई मेट्रो 7A मुळे विमानतळ थेट गाठता येईललोकल ट्रेनमध्ये मोटरमनच्या कॅबमध्ये तरुण अचानक शिरला आणि…

Go to Source