चोरापेक्षा हुशार मांजर! प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाच्या घरी मांजरीने थांबवली चोरी
घरात प्राणी पाळले जातात.काहींना कुत्रा पाळण्याची आवड असते तर काहींना मांजरी.या मुक्या प्राण्यांना प्रेम दिल्यावर ते देखील जीव लावतात आणि आपल्या मालकासाठी काहीही करू शकतात. मुंबईतून एक अशीच घटना समोर आली आहे या मध्ये एका पाळीव मांजरीने घरात चोरी थांबवली. चोर सहाव्या मजल्यावर पाईपच्या मदतीने चढून आला पण मांजरीमुळे चोरी करू शकला नाही.
हे प्रकरण आहे मुंबईतील अंधेरी भागातले. रविवारी रात्री सुमारे 3:30 वाजता चोरट्याने पाईपच्या सहाय्याने चढून चित्रपट दिग्दर्शिका स्वप्ना जोशींच्या घरात प्रवेश केला तो चोरी करण्याचा उद्धेशाने घरात फिरू लागला. महागड्या वस्तू आणि मौल्यवान वस्तू शोधण्यासाठी तो संपूर्ण फ्लॅटमध्ये फिरत राहिला. ज्या वेळी चोर फिरत होता, त्यावेळी दिग्दर्शक एका खोलीत गाढ झोपेत होत्या.
फ्लॅटमध्ये पाळीव मांजर आहे हे त्याला माहित नव्हते. मात्र मांजरीने चोरट्याला पहिले होते. मांजर अतिशय हुशारीने सोफ्याच्या मागे लपून बसली तिने आवाज अरुण घरातील सर्वांना जागे केले. चोर घाबरला आणि त्याला काही समजेल तो पर्यंत घरातील सर्व जागे झाले आणि बाहेर आले.घरात चोर शिरल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी सुरक्षा रक्षकाला ही माहिती दिली आणि पोलिसांना बोलावले. तो पर्यंत चोर 6 हजार रुपये घेऊन पसार झाला. मांजरीच्या हुशारीने मोठी चोरी होण्यापासून थांबली.ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून हे पाहून सगळे हैराण झाले. या मांजरीच्या हुशारीने घरात चोरी होणे थांबले.
Edited by – Priya Dixit