रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा श्रावण…
माझ्या लाडक्या भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते आपल्या भावा-बहिणीचे,
प्रेम आणि विश्वासाचे
देवाकडे हीच प्रार्थना की
तुझे आयुष्य नेहमी आनंदाने भरलेले राहो
Happy Raksha Bandhan!
थोडी भांडणे, थोडे रुसणे,
पण शेवटी एकमेकांवर अथांग प्रेम करणे
तू कायम असाच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
हातावर बांधलेला हा राखीचा धागा फक्त रेशीम नाही,
तर माझ्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे
रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, दादा!
भाऊ हा शब्द उलट वाचला की “ऊभा” होतो
जो प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभा राहतो
अशा माझ्या भावाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
तुझ्या यशाची शिखरं उंच असू दे,
तुझ्या आयुष्यात आनंदाची बरसात होऊ दे
या ताईचे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत
Happy Rakhi!
लहानपणीचे ते दिवस, आठवणींचा गोड ठेवा,
तुझ्यासारखा भाऊ मिळाला हेच माझे सर्वात मोठे भाग्य
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगातल्या सगळ्या सुखांपेक्षा तुझी साथ
आणि तुझे हसू माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे
तू कायम असाच हसत-खेळत राहा,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे,
माझा भाऊ नेहमी यशाने न्हाऊ दे
तुला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
कितीही मोठे झालो तरी
तुझं माझी काळजी घेणं
कधीच कमी झालं नाही
माझ्या आयुष्यातील
सर्वात चांगल्या मित्राला
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राखीचा हा पवित्र सण
आपल्या नात्यातली गोडी अशीच कायम ठेवो
तू जिथे असशील तिथे नेहमी आनंदी राहा
Happy Raksha Bandhan!
माझ्या प्रत्येक स्वप्नाला आणि निर्णयाला आधार देणाऱ्या
माझ्या लाडक्या भावाला रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तुझ्या चेहऱ्यावरचे हसू कधीच कमी न होवो
आणि तुझ्या आयुष्यात कधी सुखाची कमतरता न भासो
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बंध हा प्रेमाचा, बंध हा स्नेहाचा,
जन्मोजन्मी कायम राहो
हा बंध भाऊ-बहिणीच्या विश्वासाचा
रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!
दूर असलो तरी मनाने आपण नेहमी जवळ आहोत
या राखीसोबत माझे उदंड प्रेम आणि प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचवत आहे
Happy Raksha Bandhan!
राखीच्या धाग्यात बांधले गेले,
जन्मजन्माचे भाऊ-बहिणीचे प्रेमळ नाते!
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा,
माझ्या लाडक्या भावाला!
रक्षणाचा हा पवित्र धागा तुला
नेहमी यश, सुख आणि समृद्धी देवो
हॅपी रक्षाबंधन, माझ्या प्रिय भावा!
तू माझा फक्त भाऊ नाहीस,
तर माझा चांगला मित्र आणि पाठीराखा आहेस
तुला रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!
कधी भांडण, कधी रुसवा,
कधी प्रेम आणि जिव्हाळा,
असे आपले सुंदर नाते आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ओवाळिते भाऊराया रे,
दिवास आयुष्य लाभाओ तुला!
रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा