बिनपाकाचे, अत्यंत झटपट होणारे आणि दिसायला आकर्षक असे हे लाडू सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
साहित्य-
२ कप डेसिकेटेड कोकोनट (सुक्या खोबऱ्याचा खिस)
३/४ कप कंडेन्स्ड मिल्क
१ चमचा रोझ सिरप किंवा रोझ इमल्शन
२ ते ३ चमचे गुलकंद
सजावटीसाठी वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या व पिस्त्याचे काप
कृती-
सर्वात आधी एका कढईत मंद आचेवर डेसिकेटेड कोकोनट १ ते २ मिनिटे हलके परतून घ्या (रंग बदलू देऊ नका). त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि रोझ सिरप घालून मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत एकत्र करा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे छोटे गोळे करा. मध्ये थोडे गुलकंद भरून लाडू वळून घ्या.हे लाडू सुक्या खोबऱ्याच्या खिसामध्ये आणि गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये घोळवून सर्व्ह करा.
ALSO READ: सण-समारंभासाठी किंवा पाहुण्यांसाठी; गुलकंद पासून बनवा अतिशय सोप्या आणि शाही रेसिपीज
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Rose Gulkand Ghevar Recipe एक प्रसिद्ध आणि शाही गोड पदार्थ ”रोज गुलकंद घेवर”