दिवाळीच्या फराळामध्ये पारंपरिक चवीसोबतच काही ट्रेंडिंग आणि आधुनिक ट्विस्ट जोडल्यास फराळाची रंगत अधिक वाढते. या दिवाळीत सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये असलेली आणि बनवायला देखील सोप्पी अशी चॉकलेट ड्रायफ्रूट करंजी नक्की ट्राय करा. जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल.
साहित्य-
पारिसाठी: १ कप मैदा, १ टेबलबॉट्सन बारीक रवा, २ चमचे गरम तूप (मोहन), चिमूटभर मीठ, दूध किंवा पाणी.
सारणासाठी: १ कप किसलेले सुके खोबरे, १/२ कप मिक्स ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम, पिस्ताचे तुकडे), १/२ कप किसलेले डार्क चॉकलेट किंवा चोको चिप्स, १/४ कप पिठीसाखर, १/२ चमचा वेलची पूड.
कृती-
सर्वात आधी मैदा, रवा, मीठ आणि गरम तुपाचे मोहन एकत्र करून दुधाने घट्ट पीठ मळून घ्या व २० मिनिटे झाकून ठेवा. खोबरे हलके भाजून घ्या. त्यात ड्रायफ्रूट्स, पिठीसाखर आणि वेलची पूड मिसळा. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्यात किसलेले चॉकलेट घाला. पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटून त्यात सारण भरा आणि करंजीचा आकार देऊन कडा व्यवस्थित बंद करा. मंद ते मध्यम आचेवर करंजी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.