मुंबईसह पुण्यातही कोरोनाचा शिरकाव

मुंबईत (mumbai) 56 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आहेत, तर पुण्यातही नवीन रुग्ण आढळल्याने घबराट पसरली आहे. मुंबईनंतर पुण्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे. पुण्यातील एका 87 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही (pune) कोरोनाने प्रवेश केला आहे. शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 87 वर्षीय वृद्धाला कोरोना (covid) विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या वर्षी पुण्यात आढळलेला हा पहिलाच रुग्ण आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणेत घबराट पसरली आहे. मे महिन्यात रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ या वर्षी जानेवारीपासून कोरोनाचे (coronavirus) 87 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 31 जण बरे झाले आहेत, तर 56 जण अजूनही घरी उपचार घेत आहेत. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तथापि, महाराष्ट्रात सध्या 57 सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी फक्त एक पुण्यात आहे आणि उर्वरित राजधानी मुंबईत आहेत. मे महिन्यात संख्येत थोडीशी वाढ झाली असली तरी, ही संख्या एकाच ठिकाणची नसून विखुरलेली आहे, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. यावर्षी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही सोमवारी आरोग्य विभागाने 46 चाचण्या केल्या. त्यापैकी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या 15 होती, तर जलद चाचण्यांची संख्या 31 होती. दरम्यान, 2024 मध्ये चार लाख 84 हजार 352 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 5,528 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आणि 35 जणांचा मृत्यू झाला. मात्र, यावर्षी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 11.30 वाजता मंत्रालयात होईल. पुण्यात कोरोना विषाणूचा रुग्ण आढळल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यात (maharashtra) अवकाळी पावसामुळे शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. या मुद्द्यावरही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.हेही वाचा ठाण्यातील ‘या’ भागांमध्ये 12 तासांचा पाणीपुरवठा बंद जगबुडी नदीत कार कोसळली, पाच जणांचा जागीच मृत्यू

मुंबईसह पुण्यातही कोरोनाचा शिरकाव

मुंबईत (mumbai) 56 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आहेत, तर पुण्यातही नवीन रुग्ण आढळल्याने घबराट पसरली आहे. मुंबईनंतर पुण्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे. पुण्यातील एका 87 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे.मुंबईनंतर आता पुण्यातही (pune) कोरोनाने प्रवेश केला आहे. शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 87 वर्षीय वृद्धाला कोरोना (covid) विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या वर्षी पुण्यात आढळलेला हा पहिलाच रुग्ण आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणेत घबराट पसरली आहे.मे महिन्यात रुग्णांच्या संख्येत किंचित वाढया वर्षी जानेवारीपासून कोरोनाचे (coronavirus) 87 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 31 जण बरे झाले आहेत, तर 56 जण अजूनही घरी उपचार घेत आहेत. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तथापि, महाराष्ट्रात सध्या 57 सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी फक्त एक पुण्यात आहे आणि उर्वरित राजधानी मुंबईत आहेत. मे महिन्यात संख्येत थोडीशी वाढ झाली असली तरी, ही संख्या एकाच ठिकाणची नसून विखुरलेली आहे, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.यावर्षी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाहीसोमवारी आरोग्य विभागाने 46 चाचण्या केल्या. त्यापैकी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या 15 होती, तर जलद चाचण्यांची संख्या 31 होती. दरम्यान, 2024 मध्ये चार लाख 84 हजार 352 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 5,528 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आणि 35 जणांचा मृत्यू झाला. मात्र, यावर्षी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यताराज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 11.30 वाजता मंत्रालयात होईल. पुण्यात कोरोना विषाणूचा रुग्ण आढळल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यात (maharashtra) अवकाळी पावसामुळे शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. या मुद्द्यावरही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.हेही वाचाठाण्यातील ‘या’ भागांमध्ये 12 तासांचा पाणीपुरवठा बंदजगबुडी नदीत कार कोसळली, पाच जणांचा जागीच मृत्यू

Go to Source