लखनौ विमानतळावरून 30 तस्कर फरार

वृत्तसंस्था /लखनौ उत्तर प्रदेशातील लखनौ विमानतळावर ताब्यात घेण्यात आलेले 30 तस्कर फरार झाले आहेत. सोमवारी पोलिसांनी शारजाहमधून येणाऱ्या 36 लोकांना रोखले होते. त्यांच्याकडून 3 कोटी ऊपयांची सिगारेट आणि 23.90 लाख ऊपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सहा तस्करांनी आपल्याकडे सोने असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी उर्वरित 30 प्रवाशांची चौकशी केली असता त्यातील एकाने आजारी पडल्याचे नाटक […]

लखनौ विमानतळावरून 30 तस्कर फरार

वृत्तसंस्था /लखनौ
उत्तर प्रदेशातील लखनौ विमानतळावर ताब्यात घेण्यात आलेले 30 तस्कर फरार झाले आहेत. सोमवारी पोलिसांनी शारजाहमधून येणाऱ्या 36 लोकांना रोखले होते. त्यांच्याकडून 3 कोटी ऊपयांची सिगारेट आणि 23.90 लाख ऊपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सहा तस्करांनी आपल्याकडे सोने असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी उर्वरित 30 प्रवाशांची चौकशी केली असता त्यातील एकाने आजारी पडल्याचे नाटक केल्यामुळे विमानतळावर गोंधळ उडाला. याचा फायदा घेत सर्वजण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस आणि कस्टम विभागाचे अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत.