पोलिसांच्या हातून निसटून तरूणाची ट्रेनमधून उडी
ठाणे (thane) ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) तीन कर्मचाऱ्यांना निलंबित (suspend) केले आहे. एका 25 वर्षीय तरुणाने पोलिसांच्या ताब्यातून पळ घेत ट्रेनमधून उडी मारली. याप्रकरणी कुटुंबियांनी चौकशीची मागणी केली आहे. 17 वर्षीय तरुणीसोबत पळून गेल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला दिल्लीहून (delhi) राजधानी एक्स्प्रेसने अल्पवयीन मुलीसोबत परत आणले जात होते. त्यावेळेस संधीचा फायदा घेत टॉयलेटची खिडकी फोडून त्या व्यक्तीने ट्रेनमधून उडी मारली. आत्महत्येचा (suicide) संशय व्यक्त करत मृताच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली आहे. या तरूणाच्या मृत्यूसाठी मुलीच्या कुटुंबीयांना जबाबदार धरले जात आहे. तसेच मुलीच्या कुटुंबीयांनी वारंवार त्रास दिल्याचा आरोपही केला जात आहे. त्या तरूणाचा चुलत भाऊ नीलेश जाधव यांनी सांगितले की, त्यांना या घटनेची माहिती 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मिळाली होती, तर ही घटना पहाटे 1 वाजता घडली होती.पीएसआय एस. वांगडे, महिला कॉन्स्टेबल चलवडे आणि तिचा सहकारी जोगदंडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. हे तिघे भिवंडीतील (bhiwandi) वाशिंद पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलिसांच्या अहवालानुसार, पडघा गावात आपल्या आई-वडिलांसोबत राहणाऱ्या या व्यक्तीचे वाशिंद गावातील तरुणीशी 2023 पासून प्रेमसंबंध होते. लग्न करण्याचा विचार करून ते जुलैमध्ये पळून गेले होते. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाशिंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हर्षवर्धन बर्वे म्हणाले, “आम्हाला ऑगस्टमध्ये दोघांच्या ठावठिकाणा विषयी माहिती मिळाली. त्यानंतर (आता निलंबित) पोलिसांची टीम दिल्लीला रवाना झाली जिथे ते राहत होते.ही घटना 28 ऑगस्टच्या रात्री मुरैना आणि ग्वाल्हेर स्थानकांदरम्यान चालू गाडीत घडली, असे पोलिसांनी सांगितले. तो तरूण दोनदा टॉयलेटला गेला, पण तिसऱ्यांदा गेला तेव्हा तो बराच वेळ परतला नाही, असे पोलिसांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जेव्हा टीमने दार ठोठावल्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि शेवटी स्क्रू ड्रायव्हरने दरवाजा उघडला गेला.मात्र, खिडकीचे काच तुटलेले असताना त्यांना आतमध्ये तरूण दिसला नाही. त्यानंतर, टीमने मुरैना गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांशी (GRP) संपर्क साधला आणि त्या व्यक्तीला शोधण्यासाठी 40 किमीचा मार्गावर पुन्हा मागे शोध घेतला तेव्हा तो ट्रॅकच्या बाजूला पडलेला दिसला.जीआरपीने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. चालत्या ट्रेनमधून उडी मारल्यानंतर त्याच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले.त्यानंतर टीमने वरिष्ठांना माहिती दिली आणि त्या व्यक्तीच्या कुटुबियांनाही माहिती दिली. मुरैना रुग्णालयात मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले आणि नंतर मृतदेह भिवंडीत आणण्यात आला. दरम्यान, मुरैना जीआरपीने अपघाती मृत्यूची नोंद केली.हेही वाचा प्रवाशांनो लक्ष द्या! मालाड स्थानकात मोठे बदलपश्चिम रेल्वेवर वेगमर्यादा लागू, लोकल फेऱ्याही रद्द
Home महत्वाची बातमी पोलिसांच्या हातून निसटून तरूणाची ट्रेनमधून उडी
पोलिसांच्या हातून निसटून तरूणाची ट्रेनमधून उडी
ठाणे (thane) ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) तीन कर्मचाऱ्यांना निलंबित (suspend) केले आहे. एका 25 वर्षीय तरुणाने पोलिसांच्या ताब्यातून पळ घेत ट्रेनमधून उडी मारली. याप्रकरणी कुटुंबियांनी चौकशीची मागणी केली आहे.
17 वर्षीय तरुणीसोबत पळून गेल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला दिल्लीहून (delhi) राजधानी एक्स्प्रेसने अल्पवयीन मुलीसोबत परत आणले जात होते. त्यावेळेस संधीचा फायदा घेत टॉयलेटची खिडकी फोडून त्या व्यक्तीने ट्रेनमधून उडी मारली.
आत्महत्येचा (suicide) संशय व्यक्त करत मृताच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली आहे. या तरूणाच्या मृत्यूसाठी मुलीच्या कुटुंबीयांना जबाबदार धरले जात आहे. तसेच मुलीच्या कुटुंबीयांनी वारंवार त्रास दिल्याचा आरोपही केला जात आहे.
त्या तरूणाचा चुलत भाऊ नीलेश जाधव यांनी सांगितले की, त्यांना या घटनेची माहिती 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मिळाली होती, तर ही घटना पहाटे 1 वाजता घडली होती.
पीएसआय एस. वांगडे, महिला कॉन्स्टेबल चलवडे आणि तिचा सहकारी जोगदंडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. हे तिघे भिवंडीतील (bhiwandi) वाशिंद पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
पोलिसांच्या अहवालानुसार, पडघा गावात आपल्या आई-वडिलांसोबत राहणाऱ्या या व्यक्तीचे वाशिंद गावातील तरुणीशी 2023 पासून प्रेमसंबंध होते. लग्न करण्याचा विचार करून ते जुलैमध्ये पळून गेले होते. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वाशिंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हर्षवर्धन बर्वे म्हणाले, “आम्हाला ऑगस्टमध्ये दोघांच्या ठावठिकाणा विषयी माहिती मिळाली. त्यानंतर (आता निलंबित) पोलिसांची टीम दिल्लीला रवाना झाली जिथे ते राहत होते.
ही घटना 28 ऑगस्टच्या रात्री मुरैना आणि ग्वाल्हेर स्थानकांदरम्यान चालू गाडीत घडली, असे पोलिसांनी सांगितले. तो तरूण दोनदा टॉयलेटला गेला, पण तिसऱ्यांदा गेला तेव्हा तो बराच वेळ परतला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जेव्हा टीमने दार ठोठावल्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि शेवटी स्क्रू ड्रायव्हरने दरवाजा उघडला गेला.
मात्र, खिडकीचे काच तुटलेले असताना त्यांना आतमध्ये तरूण दिसला नाही. त्यानंतर, टीमने मुरैना गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांशी (GRP) संपर्क साधला आणि त्या व्यक्तीला शोधण्यासाठी 40 किमीचा मार्गावर पुन्हा मागे शोध घेतला तेव्हा तो ट्रॅकच्या बाजूला पडलेला दिसला.
जीआरपीने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. चालत्या ट्रेनमधून उडी मारल्यानंतर त्याच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर टीमने वरिष्ठांना माहिती दिली आणि त्या व्यक्तीच्या कुटुबियांनाही माहिती दिली. मुरैना रुग्णालयात मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले आणि नंतर मृतदेह भिवंडीत आणण्यात आला. दरम्यान, मुरैना जीआरपीने अपघाती मृत्यूची नोंद केली.हेही वाचा
प्रवाशांनो लक्ष द्या! मालाड स्थानकात मोठे बदल
पश्चिम रेल्वेवर वेगमर्यादा लागू, लोकल फेऱ्याही रद्द