हिडकलमधून 25 हजार क्युसेक विसर्ग
गुरुवारी पुन्हा पावसाचा जोर वाढला : जलाशय परिसरात पर्यटकांची गर्दी
संकेश्वर : गुरुवारी दुपारनंतर पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत सुमारे 3 फुटांनी वाढ झाली आहे. तरी नद्यांनी धोकापातळी अद्याप ओलांडलेली नाही. राजा लखमगौडा जलाशयात 5 टीएमसी पाण्याची वाढ झाली असून 48 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जलाशयातून सध्या 25 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात असून जलाशय परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. गुरुवारी सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन झाले. रिपरिप पावसातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र दुपारी 1 च्या सुमारास पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम परिसरातील नदी प्रवाहात होत आहे. सध्या 48 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जलाशयातून सध्या 25 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी हिरण्यकेशी, घटप्रभा व ताम्रपर्णी नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. चंदगड, आजरा, आंबोली या भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने परिसरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होताना दिसत आहे. हिडकल जलाशयातून विसर्ग करण्यात येणारे पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जलाशय परिसरात बॅरिकेड्स लावून बंदोबस्त ठेवला आहे. रात्रीच्यावेळी जलाशय आवाराला केली जाणारी विद्युत रोषणाई पाहण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. आगामी दोन दिवसांत हिडकल जलाशयात 51 टीएमसी पाणी साठणार असल्याची माहिती जलाशय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Home महत्वाची बातमी हिडकलमधून 25 हजार क्युसेक विसर्ग
हिडकलमधून 25 हजार क्युसेक विसर्ग
गुरुवारी पुन्हा पावसाचा जोर वाढला : जलाशय परिसरात पर्यटकांची गर्दी संकेश्वर : गुरुवारी दुपारनंतर पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत सुमारे 3 फुटांनी वाढ झाली आहे. तरी नद्यांनी धोकापातळी अद्याप ओलांडलेली नाही. राजा लखमगौडा जलाशयात 5 टीएमसी पाण्याची वाढ झाली असून 48 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जलाशयातून सध्या 25 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात असून जलाशय परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत […]