बजाज ऑटोच्या वाहन विक्रीत 24 टक्के वाढ

आर्थिक वर्षात हिरोने विकली सर्वाधिक वाहने वृत्तसंस्था /नवी दिल्ली ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोने 2023-24 आर्थिक वर्षात वाहन विक्रीत चांगली कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने मागच्या आर्थिक वर्षात देशांतर्गत वाहन विक्रीत 24 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. एलकेपी सिक्योरीटीज यांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीने सदरच्या आर्थिक वर्षात 22.5 लाख वाहनांची विक्री करण्यामध्ये यश […]

बजाज ऑटोच्या वाहन विक्रीत 24 टक्के वाढ

आर्थिक वर्षात हिरोने विकली सर्वाधिक वाहने
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोने 2023-24 आर्थिक वर्षात वाहन विक्रीत चांगली कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने मागच्या आर्थिक वर्षात देशांतर्गत वाहन विक्रीत 24 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. एलकेपी सिक्योरीटीज यांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीने सदरच्या आर्थिक वर्षात 22.5 लाख वाहनांची विक्री करण्यामध्ये यश मिळवले आहे. देशातील चार मोठ्या दुचाकी वाहन कंपन्यांच्या तुलनेत यांची वाहन विक्री ही अधिक दमदार राहिली आहे. मूल्यात झालेली वाढ, नव्या मॉडेल्सचे सादरीकरण यामुळे कंपनीने ग्रामीण बाजारात धिम्या गतीने व स्थिर सुधारणा करण्यात यश मिळवलं आहे. यानेच कंपनीच्या वाहन विक्रीत वाढ दिसली आहे. दुसरीकडे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये टीव्हीएस मोटर्सच्या देशांतर्गत विक्रीत 21 टक्के वाढ झाली आहे. त्यांची विक्री सदरच्या आर्थिक वर्षात 31.5 लाख इतकी राहिली आहे. तर देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन निर्माती कंपनी हिरो मोटोकॉर्पने सदरच्या आर्थिक वर्षात 5 टक्के वाढीसह 54.2 लाख वाहनांची विक्री केली आहे. बजाज, केटीएम आणि ट्रायम्फ या प्रिमीयम मोटरसायकलींची विक्री आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उत्साहवर्धक राहणार आहे.