राज्यात 28 दिवसांत उष्माघाताच्या 23 रुग्णांची नोंद
मार्च महिन्यात राज्यात 23 जणांना उष्माघाताचा फटका बसला. अमरावतीमध्ये तिघांना, तर पुणे, रायगड,कोल्हापूर येथे दोघांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात ठाणे येथील एकाचा समावेश असून, मुंबईमध्ये मात्र एकही नोंद नाही.अहमदनगर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नांदेड, सातारा, ठाणे येथे एका व्यक्तीला, तर बुलढाणा, बीड, कोल्हापूर, पुणे, रायगड येथे दोघांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मार्च महिन्यात एकूण २३ जणांना वाढलेल्या उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या. राज्यात गेल्या वर्षी 1 मार्च ते 31 जुलै या कालावधीत उष्माघातामुळे २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील सर्वाधिक म्हणजे 13 मृत्यूंची नोंद ही औरंगाबाद जिल्ह्यात झाली होती.0 यंदा 1 ते 20 मार्च या कालावधीत उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद झाली होती. त्यात सर्वाधिक म्हणजे चार रुग्ण हे बीड जिल्ह्यातील होते. त्यापुढील आठ दिवसांत म्हणजे 28 मार्चपर्यंत आठ नव्या रुग्णांची नोंद झाली. या कालावधीत एकाही रुग्णमृत्यूची नोंद नाही.
उष्णतेशी निगडित आजारांच्या औषधांची उपलब्धता रुग्णालयामध्ये ठेवावी. उष्माघाताचा त्रास झालेला रुग्ण येताच त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करावेत. उच्चरक्तदाब, मधुमेह यासारखे सहआजार असलेल्यांसह लहान मुले, गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घेण्याकडे आरोग्य विभागाने लक्ष वेधले आहे.कडक उन्हामध्ये बाहेर पडताना काळजी घ्या, दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असताना गरज असेल तरच बाहेर पडा असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
हेही वाचामुंबई आणि महाराष्ट्रात तापमान वाढणार, IMD कडून इशारा
मुंबईत 60 नवीन स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यात येणार
Home महत्वाची बातमी राज्यात 28 दिवसांत उष्माघाताच्या 23 रुग्णांची नोंद
राज्यात 28 दिवसांत उष्माघाताच्या 23 रुग्णांची नोंद
मार्च महिन्यात राज्यात 23 जणांना उष्माघाताचा फटका बसला. अमरावतीमध्ये तिघांना, तर पुणे, रायगड,कोल्हापूर येथे दोघांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात ठाणे येथील एकाचा समावेश असून, मुंबईमध्ये मात्र एकही नोंद नाही.
अहमदनगर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नांदेड, सातारा, ठाणे येथे एका व्यक्तीला, तर बुलढाणा, बीड, कोल्हापूर, पुणे, रायगड येथे दोघांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मार्च महिन्यात एकूण २३ जणांना वाढलेल्या उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या. राज्यात गेल्या वर्षी 1 मार्च ते 31 जुलै या कालावधीत उष्माघातामुळे २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील सर्वाधिक म्हणजे 13 मृत्यूंची नोंद ही औरंगाबाद जिल्ह्यात झाली होती.
0 यंदा 1 ते 20 मार्च या कालावधीत उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद झाली होती. त्यात सर्वाधिक म्हणजे चार रुग्ण हे बीड जिल्ह्यातील होते. त्यापुढील आठ दिवसांत म्हणजे 28 मार्चपर्यंत आठ नव्या रुग्णांची नोंद झाली. या कालावधीत एकाही रुग्णमृत्यूची नोंद नाही.उष्णतेशी निगडित आजारांच्या औषधांची उपलब्धता रुग्णालयामध्ये ठेवावी. उष्माघाताचा त्रास झालेला रुग्ण येताच त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करावेत. उच्चरक्तदाब, मधुमेह यासारखे सहआजार असलेल्यांसह लहान मुले, गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घेण्याकडे आरोग्य विभागाने लक्ष वेधले आहे.
कडक उन्हामध्ये बाहेर पडताना काळजी घ्या, दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असताना गरज असेल तरच बाहेर पडा असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.हेही वाचा
मुंबई आणि महाराष्ट्रात तापमान वाढणार, IMD कडून इशारामुंबईत 60 नवीन स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यात येणार