स्किट स्पर्धेत शिराझ सर्वोत्तम

स्किट स्पर्धेत शिराझ सर्वोत्तम

वृत्तसंस्था/ लोनॅटो (इटली)
सध्या येथे सुरु असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक शॉटगन नेमबाजी स्पर्धेत स्किट नेमबाजी प्रकारात भारतातर्फे नेमबाज शिराझ शेखने पात्र फेरीमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
पुरुषांच्या स्किट नेमबाजी प्रकारात पात्रतेच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये शिराझने 25 शॉट्स अचूक नोंदविले. महिलांच्या स्किट नेमबाजी प्रकारात भारताची गनेमत शेखॉला 21 व्या स्थानावर तर रैझा धिलॉला 28 व्या समाधान मानावे लागले आहे.